Ram Mandir Chaphal : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चाफळ राम मंदिरात शंभूराज देसाई, उदयनराजेंनी केली महाआरती...

Amol Sutar

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामललाच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला.

PM Narendra Modi | Sarkarnama

चाफळ राम मंदिर

अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तीर्थक्षेत्र चाफळ येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

Chaphal Ram mandir | Sarkarnama

शंभूराज देसाई, उदयनराजे भोसले

या महाआरतीला पालकमंत्री शंभूराज देसाई व उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

Shambhuraj Desai, Udayanraje Bhosale | Sarkarnama

प्रभू श्रीरामांची वेशभूषा

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने देशभर उत्साहाचे वातावरण होते. यावेळी लहान मुलांनी प्रभू श्रीरामांची वेशभूषा केली होती. अशाच एका रामरुपातील मुलाला जवळ घेत फोटो काढला.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

उदयनराजेंना भेट

चाफळ येथील राम मंदिरात महाआरतीला उपस्थित उदयनराजेंना मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने चाफळ राम मंदिराचे छायाचित्र भेट म्हणून देण्यात आले.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

उदयनराजेंची उपस्थिती

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने सर्वत्र प्रभू श्रीरामांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदयनराजे यांनी विविध ठिकाणच्या सोहळ्यांना उपस्थिती लावली.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

भक्तीसंगीत कार्यक्रमास उपस्थिती

चाफळ राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भक्तीसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास शंभूराज देसाई आणि मनोज घोरपडे यांनी उपस्थिती लावली.

Shambhuraj Desai, Manoj Ghorpade | Sarkarnama

भाविकांची गर्दी

चाफळ येथील महाआरती सोहळ्यास जिल्ह्यातील भाविकांनी गर्दी केली होती.

Mahaarati | Sarkarnama

उत्साहाचे वातावरण

उदयनराजे भोसले यांनी महाआरती सोहळ्यानिमित्ताने चाफळ मंदिरास भेट दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात राम भक्तांची उपस्थिती होती.

Ram Mandir Chaphal | Sarkarnama

NEXT : IAS K.R. Nandini: कर्नाटकच्या 'या' महिलेने रचला इतिहास, UPSC टॉपर नंदिनी...

येथे क्लिक करा