Pradeep Pendhare
राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा कबड्डीपटू शंकर गदई याचा क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार खडतर असाच आहे.
राज्य स्पर्धेत एक सुवर्ण, चार रौप्य आणि एक ब्राँझपदक पटकवलं आहे.
नेवासा इथल्या भेंडा या गावातील शंकर गदई यानं सातवीपासून कबड्डी स्पर्धा खेळायला सुरुवात केली.
भारतासाठी खेळायचं असून, त्यानं त्याची तयारी सुरू केली आहे.
वडील ऊसतोड मजूर असून, त्यांचं शंकरला नेहमीच खेळासाठी प्रोत्साहन मिळालं.
शंकर यानं महाराष्ट्र कबड्डी संघाचा कॅप्टन म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
प्रो-कबड्डीत तेलुगु टायगर, गुजरात संघाकडून चमकदार असा खेळ करत सर्वांच्या नजरेत भरला आहे.
शंकर गदईसह अहिल्यानगरमधील अस्लम इनामदार, डाॅ. शुभांगी रोकडे-दळवी आणि कोमल वाकळे यांना देखील पुरस्कार जाहीर झालेत.