Deepak Kulkarni
शांतिगिरी महाराज यांनी शुक्रवारी (ता.26) नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे ते पहिले उमेदवार ठरले आहेत.
शांतिगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे.
काही राजकीय पक्षांकडेही शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी मागितली होती. पण त्यांना राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळू शकली नाही.
त्यांच्याकडे महाराष्ट्रातील 53 गावांमध्ये शेतजमिनी आहेत. विविध भक्तांनी दान केलेल्या जमिनींसह खरेदी केलेल्या जमिनींचाही यामध्ये समावेश आहे.
या जमिनीचे एकूण मूल्य 38.87 कोटी आहे.
ब्रह्मचारी असलेल्या शांतिगिरी यांचे शिक्षण निफाड तालुक्यात झाले आहे. ते दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांच्याकडे काही लक्झरी नऊ वाहने आहेत.
त्यांच्याकडे 50 हजार रुपये रोख आहेत. याशिवाय 2.40 लाखांची जीवन विमा पॉलिसी आहे.