Nashik Loksabha constituency : नाशिकमधून लोकसभेला शड्डू ठोकणारे शांतिगिरी महाराज आहेत 'एवढ्या’ संपत्तीचे मालक!

Shantigiri Maharaj News : शांतिगिरी महाराजांनी मिरवणूक न काढता, शक्तिप्रदर्शन न करता नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शांतिगिरी महाराज यांचे गुरु मौनगिरी जनार्दन स्वामी यांचा जन्म अनुराधा नक्षत्रात झाला होता, त्यामुळे या मुहूर्तावर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासमवेत त्यांचे काही मोजके सहकारी होते
Shantigiri Maharaj
Shantigiri Maharaj Sarkarnama
Published on
Updated on

Nashik, 26 April : शांतिगिरी महाराज यांनी आज नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे ते पहिले उमेदवार ठरले आहेत. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी आज आपला अर्ज दाखल केला.

शांतिगिरी महाराजांनी मिरवणूक न काढता, शक्तिप्रदर्शन न करता नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांचे गुरु मौनगिरी जनार्दन स्वामी यांचा जन्म अनुराधा नक्षत्रात झाला होता, त्यामुळे या मुहूर्तावर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासमवेत त्यांचे काही मोजके सहकारी होते.

Shantigiri Maharaj
Abhijeet Patil : सत्ताधाऱ्यांची ऑफर धुडकावून शरद पवारांना साथ देणारा नेता!

अरुण शेठ पवार, गणेश पगार, राजाराम पानगव्हाणे उगाव, राजू इंगोले, संजय भास्करे असे मोजके सहकारी शांतिगिरी महाराज यांच्या समवेत होते, त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जल्लोष शर्मा यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शांतिगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) जय्यत तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत ते विशेष तयारीने यंदा उतरले आहेत. काही राजकीय पक्षांकडेही शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी मागितली होती. पण त्यांना राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळू शकली नाही, त्या अपक्ष अर्ज दाखल केलेल्या शांतिगिरी महाराजांचा विजय निश्चित आहे, असा दावा त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.

शांतिगिरी महाराज यांच्याकडे महाराष्ट्रातील 53 गावांमध्ये शेतजमिनी आहेत. विविध भक्तांनी दान केलेल्या जमिनींसह खरेदी केलेल्या जमिनींचाही यामध्ये समावेश आहे. या जमिनीचे एकूण मूल्य ३८.८७ कोटी आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्र्यंबकेश्वर, येवला यांसह विविध तालुक्यांतील या शेतजमिनी आहेत. त्यांचे क्षेत्रही लक्षणीय आहे.

Shantigiri Maharaj
Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज अपक्ष लढणार, नाशिक मतदारसंघात तिरंगी लढत?

ब्रह्मचारी असलेल्या शांतिगिरी यांचे शिक्षण निफाड तालुक्यात झाले आहे. ते दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांच्याकडे काही लक्झरी नऊ वाहने आहेत. या वाहनांची किंमत ६७.९१ लाख आहे. त्यांचे विविध बारा बँकांमध्ये खाती आहेत. मात्र या खात्यांमध्ये लक्षणीय असे डिपॉझिट नाही. या खात्यांमध्ये अतिशय नगण्य शिल्लक आहे. त्यांच्याकडे ५० हजार रुपये रोख आहेत. याशिवाय २.४० लाखांची जीवन विमा पॉलिसी आहे.

Shantigiri Maharaj
Uttam Jankar News : उत्तम जानकरांचा शहाजीबापूंवर पलटवार; 'सुपारी फुटली, हळद लागली आता...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com