Sunil Balasaheb Dhumal
बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली
येथून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे तर भाजपकडून पंकजा मुंडे आमनेसामने आहेत.
या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप सोनवणेंनी केला. त्याबाबतचे अनेक व्हिडिओही दिले.
याबाबत आयोगाने खुलासा मागितल्यावर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी बोगस मतदान झाले नसल्याचे सांगितले.
यावरून चिडलेले सोनवणे यांनी आयोगाला पत्र देत दीपा मुधोळ मुंडे यांना मतमोजणीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ देऊ नये, अशी मागणी केली.
दीपा मुधोळ मुंडे या जिल्ह्यातीलच रहिवाशी असल्याचेही सोनवणेंनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर आयोगाने बीडच्या मतमोजणी प्रक्रियेत दोन आयएएस अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
मुधोळ या 2011 च्या बॅचच्या अधिकारी असून त्यांनी चंद्रपूर, बुलढाणा, सांगली, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांवर काम केले आहे.
NEXT : मतदानासाठी वेळ लागत असल्याने EVM फोडणारे प्रशांत जगदेव कोण?