Prashant Jagdev : मतदानासाठी वेळ लागत असल्याने EVM फोडणारे प्रशांत जगदेव कोण?

Mayur Ratnaparkhe

मतदानासाठी बराचवेळ रांगेत उभा रहावे लागल्याने प्रशांत जगदेव यांनी चक्क ईव्हीएम मशीनच फोडली.

ओडिशातील चिल्का विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आहेत प्रशांत जगदेव.

मतदानासाठी पत्नीसह मतदान केंद्रावर पोहचले होते, मात्र मतदान यंत्रातील बिघाडामुळे उशीर झाला.

...त्यामुळे संतापलेल्या जगदेव यांनी केंद्रातील अधिकाऱ्यांसोबत वाद घातला.

वाद टोकाला पोहचल्यानंतर जगदेव यांनी ईव्हीएम मशीन हिसकावून घेत जमिनीवर फेकली.

अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर जगदेव यांना अटक करण्यात आली आहे.

त्यांना कोर्टात सादर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सत्ताधारी बीजेडीने जगदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Next : विलासराव देशमुखांच्या जयंतीदिनीन 'या' नेत्यांनी केले अभिवादन

Vaishali Deshmukh | Sarkarnama