Ganesh Sonawane
खासदार सुप्रिया सुळे यांनी लेक अर्थात शरद पवार यांची नात रेवती सुळे हीचे लग्न ठरले आहे.
नागपूरच्या लखानी कुटुंबासोबत सुळे कुटुंबियांची सोयरिक जुळली आहे. रेवती सुळे यांचा विवाह सारंग अरुण लखानी यांच्याशी होणार आहे.
रेवती यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना आजोबा शरद पवार आणि नात रेवती या दोघांमधील खास बाँडिंग काही फोटोमध्ये दिसते.
सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना दोन मुले आहेत. मुलीचं नाव रेवती असं आहे. मुलाचं नाव विजय सुळे असं आहे.
सुळे कुटुंबियांचे फोटो नेहमीच आजोबा शरद पवार व आजी प्रतिभा पवार यांच्यासोबत व्हायरल होत असतात.
आता रेवती यांचा विवाह निश्चित झाल्यानंतर त्यांचे आजोबा शरद पवार यांच्या सोबतचे जिव्हाळ्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
पवार-सुळे कुटुंबातील नातेसंबंध किती घट्ट आहेत हे या फोटोंमधून दिसते.
सुप्रिया सुळे आणि त्यांची लेक रेवती यांचं आई - लेकीचं नातं देखील फार घट्ट आहे. सुप्रिया सुळे नेहमी रेवती यांचे सोशल मीडियावर कौतुक करतात.