नाशिकच्या आक्रोश मोर्चातून शरद पवारांचा सरकारला इशारा ; भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Ganesh Sonawane

नाशिकमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी पवारांनी राज्यातील फडणवीस सरकारला इशारा दिला. जाणून घेऊया शरद पवार काय म्हणाले..

Sharad Pawar | Sarkarnama

जबाबदारी घ्यायला तयार नाही

शेतकऱ्यावर संकट आल्यावर त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्राची असते. पण आजचे राज्यकर्ते जबाबदारी घ्यायला तयार नाहीत.

Sharad Pawar | Sarkarnama

बघ्याची भूमिका घेता येणार नाही

गेल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आता आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही.

Sharad Pawar | Sarkarnama

फार गंभीर गोष्ट

शेतकरी जीव देतो, एवढी टोकाची भूमिका घेतो परंतु असे असतानाही संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्या मागे उभे राहत नाही ही फार गंभीर गोष्ट आहे.

sharad pawar | sarkarnama

देवाभाऊ शहाणपणा घेतील

नेपाळमध्ये काय घडले त्याच्या खोलात मी जात नाही. मात्र देवाभाऊ यातून शहाणपणा घेतील.

Sharad pawar | Sarkarnama

ही फक्त सुरुवात

मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी कर्जमाफीची कार्यवाही आठ दिवसात सुरू न केल्यास नाशिक ही फक्त सुरुवात आहे, याहून मोठे शक्ती प्रदर्शन होईल.

sharad pawar | sarkarnama

नुसतं होर्डिंग लावून चालत नाही

देवाभाऊ केवळ होर्डिंग लावून चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श देखील घेतला पाहिजे. महाराजांचा आदर्श घेऊन तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या.

sharad pawar | sarkarnama

कृषीमंत्री असताना कर्जमाफी

कर्जबाजारीपणा हा मोठा रोग असून, त्यावर उपचार केले पाहिजे म्हणून मी देशाचा कृषीमंत्री असताना आम्ही १० दिवसांत ७० हजार कोटी रुपये देऊन कर्जमाफी केली होती.

Sharad Pawar | Sarkarnama

शेतकऱ्याचे दु:ख समजत नाही

नाशिकचा कांदा जगात जातो. त्यात सरकारने निर्यात बंदी केली. सरकारला शेतकऱ्यांचे दु:ख समजत नाही.

Sharad Pawar | Sarkarnama

Next : नावांमध्ये साम्य तरी, 'बंजारा' अन् 'वंजारी' समाजात फार 'मोठा' फरक...

Banjara community ST quota demand | Sarkarnama
येथे क्लीक करा