Aslam Shanedivan
राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींचे निकाल आले आहेत. ज्यात राज्यभर प्रस्थापितांना धक्के लागले आहे.
अशातच बुलढाण्यातील सिंदखेडराजा नगर परिषदेत नगराध्यक्षाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल आला आहे.
येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सौरभ तायडे याने अवघ्या २१ व्या वर्षी सिंदखेड राजाच्या विकासाची चाबी हाती घेतली आहे
सौरभ विजय तायडे यांने मिळवलेल्या ऐतिहासिक विजय आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
सौरभ तायडे यांचे वय अवघे २१ वर्षे १० महिने २८ दिवस असून तो सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरला आहे.
सौरभचे एमएस्सी बी.एड शिक्षण झाले असून आई-वडील, २ बहीण असे त्यांचे कुटूंब आहे. आज्जींनी उपनगराध्यक्ष म्हणून काम केले आहे.