Siddhi Vastre : भावाने सूत्र फिरवली अन् सीए व्हायला निघालेली सिद्धी थेट नगराध्यक्षाच्या खुर्चीवर!

Rashmi Mane

मोहोळमध्ये राजकीय उलथापालथ

मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय धक्का बसला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने मुसंडी मारत सत्ता काबीज केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या निवडणुकीत निर्णायक विजय मिळवला आहे.

22 वर्षांची तरुणी नगराध्यक्ष

शिवसेनेच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजप उमेदवाराचा 170 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपद पटकावलं. अवघ्या 22 व्या वर्षी सिद्धी वस्त्रे या राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्षांपैकी एक ठरल्या. सिद्धीचे चुलत भाऊ किशोर वस्त्रे व दिग्विजय वस्त्रे यांनी शिवसेनेच्या रमेश बारसकर यांच्याशी चर्चा करून सिद्धीला राजकारणात उतरवण्याचा निर्णय घेतला होता.

तरुण चेहऱ्यावर शिवसेनेचा विश्वास

सिद्धी वस्त्रे या नवख्या पण तरुण चेहऱ्यावर शिवसेनेने विश्वास दाखवला. मतदारांनीही बदलाला संधी देत तरुण नेतृत्वाला पाठिंबा दिला. मोहोळच्या राजकारणात हा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे.

30 वर्षांनंतर वस्त्रे कुटुंबाची

तब्बल 30 वर्षांनंतर वस्त्रे कुटुंब पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलं. सिद्धी वस्त्रे यांचे आजोबा पूर्वी सरपंच होते. जुना विश्वास कायम ठेवत मतदारांनी पुन्हा या कुटुंबाला संधी दिली.

साधी पार्श्वभूमी, मोठा विजय

बीकॉम झाल्यानंतर एमकॉमला प्रवेश घेतलेल्या सिद्धीने घरच्या परिस्थितीमुळे सीएकडे सात हजार पगारावर नोकरी केली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धीने थेट नगराध्यक्षपद गाठत इतिहास घडवला.

कुटुंबाचा मोलाचा पाठिंबा

आई गृहिणी, वडील नोकरीत, दोन भाऊ आणि एक बहीण असा सिद्धीचा परिवार आहे. आई-वडील आणि भावंडांनी प्रचारात पूर्ण साथ दिली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झाल्याचं सिद्धीने सांगितलं.

Next : आरारारा...खतरनाक ! राज्यात विक्रमी मतानं जिंकलेला नगराध्यक्ष, तब्बल 42 हजारांचं लीड; कोण आहे उमेदवार?

येथे क्लिक करा