Akshay Sabale
लोकसभा निवडणुकीत राज्यात जसा निकाल लागला, त्यावरून विधानसभा निवडणुकीतही राज्यात लोकांना बदल हवाय, असं विधान शरद पवारसाहेबांनी केलं आहे.
'मविआ' ज्यारितीने एकसंघ राहून लोकसभा लढली तशी विधानसभेला राहायला हवी, जर राहिली तर आजच्या राज्यकर्त्यांना फटका बसेल, असंही पवारसाहेबांनी म्हटलं.
डाव्या पक्षांनी लोकसभेला एकही जागा न मागत त्यांनी सहकार्य केलं. त्यांना विधानसभेला जागा सोडाव्यात, अशी माझी सूचना आहे, असं पवारसाहेब म्हणाले.
चंद्राबाबू, नितीश कुमार यांच्या मदतीनं या सरकारची स्थिरता आहे. हे दोघेही पार्टनर जोपर्यंत मोदींसोबत आहेत तोपर्यंत केंद्र सरकारला धोका नाही, असं पवारसाहेबांनी सांगितलं.
काही लोकांनी पुन्हा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, सरसकट सगळ्यांना घेण्याची मनस्थिती आमची नाही, असं पवारसाहेबांनी स्पष्ट केलं.
सरकारच्या तिजोरीत काय नाही मग पैसे देणार कुठून, निवडणुकीच्या आधी एखादं दुसरा हफ्ता देण्याचा प्रयत्न होईल, असं म्हणत 'लाडकी बहीण' योजनेवर पवारसाहेबांनी प्रतिक्रिया दिली.