Rashmi Mane
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी गेले होते.
सुलतानपूर दिवाणी न्यायालयाकडून लखनौला जात असताना, गुप्तरगंजमधील आमदार नगरमधील रामशेत यांच्या चप्पलच्या दुकानासमोर राहुल गांधींचा ताफा अचानक थांबला.
लोकांना काही समजण्याआधीच राहुल गांधी दुकानात गेले येथे त्यांनी शूज आणि चप्पलही शिवल्या. तसेच कामात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
राहुल यांनी रामशेट यांच्या कुटुंबीयांशीही गप्पा मारल्या.
राहुल गांधी चांभाराच्या दुकानावर बसलेले पाहून लोकही थक्क झाले. काही वेळातच शेकडो लोक राहुल गांधींना पाहण्यासाठी जमले.
राहुल गांधींनी त्यांच्या प्रश्नांवरही चर्चा केली. याशिवाय शूज आणि चप्पल कशी दुरुस्त करायची हेही त्यांनी रामशेटकडून शिकून घेतले.
रामशेटने राहुल गांधींसाठी कोल्ड ड्रिंकची ऑर्डरही दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.