Sharad Pawar News : प्रादेशिक पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण ते उद्धव ठाकरेंचे विचार; शरद पवार काय म्हणाले?

Akshay Sabale

काँग्रेसमध्ये विलीन -

अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या आणखी जवळ जातील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

sharad pawar | sarkarnama

काँग्रेससोबत समन्वयानं काम -

पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेसबरोबर अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचं हित लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये विलीन होतील.

sharad pawar | sarkarnama

काँग्रेस, राष्ट्रवादीत फरक नाही -

मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कोणताही फरक दिसत नाही. वैचारकिदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरूंची विचारसरणी मानणारे आहोत.

sharad pawar | sarkarnama

एकत्र येण्याबाबत बोलणार नाही -

प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत मी आत्ताच बोलू शकणार नाही. सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय काहीही बोलणार नाही.

sharad pawar | sarkarnama

काँग्रेस जवळचा पक्ष -

वैचारिकदृष्ट्या आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा आहे. पण, आमच्या पक्षाबाबत कोणतंही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीनं निर्णय घेतला जाईल.

sharad pawar | sarkarnama

पंतप्रधानांशी जुळवून घेणं अवघड -

पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेणं किंवा त्यांचे विचार पचनी पडणं आमच्यासाठी अवघड आहे.

sharad pawar | sarkarnama

फुटलेल्यांना जनतेची साथ नाही -

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीवर शरद पवार म्हणाले, ज्यांनी मोदी यांना साथ दिली आहे, त्यांना जनता पसंत करत नाही.

sharad pawar | sarkarnama

उद्धव ठाकरे सकारात्मक -

उद्धव ठाकरे हे देखील एकत्र काम करण्याच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक आहेत. समविचारी पक्षांसोबत काम करण्यासाठी ते तयार आहेत.

sharad pawar | sarkarnama

उद्धव ठाकरेंची विचारसारणी सारखीच -

मी गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरेंच्या विचाराची पद्धत अनुभवली आहे, ते आमच्यासारखेच आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले.

sharad pawar | sarkarnama

NEXT : 4 कोटींचं कर्ज अन् 50 तोळे सोनं; रावसाहेब दानवेंची एकूण संपत्ती किती?

Raosaheb danve | sarkarnama