Sharad Pawar : शरद पवार यांच्या राजकीय जीवनातील 8 महत्त्वाच्या घटना

Sudesh Mitkar

महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री

मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या सरकारमधून शरद पवार 40 आमदारांसह बाहेर पाडून पवार वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले.

sharad pawar | sarkarnama

दुस-यांदा मुख्यमंत्री

1986 मध्ये पवारांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली तेव्हा राजीव गांधी यांनी शंकरराव चव्हाण यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं आणि शरद पवार दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

sharad pawar | sarkarnama

3 विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न पेटला

औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न पेटला आणि जातीय दंगली झाल्या. त्या रोखण्यासाठी 1994 मध्ये पवारांनी नामांतराऐवजी नामविस्ताराची कल्पना मांडली. आणि 'डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असा नामविस्तार झाला.

sharad pawar | sarkarnama

'राष्ट्रवादीची स्थापना

काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हावे असे मानणारा एक मोठा वर्ग होता. शेवटी 1999 मध्ये शरद पवारांनी सोनियांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उचलला आणि पी ए संगमा, तारिक अन्वर यांच्या सोबतीनं 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'ची स्थापना केली

sharad pawar | sarkarnama

पवारांचा पराभव

शरद पवार यांना आपल्या कारकिर्दीतला हा एकमेव पराभव 2004 मध्ये झाला. बीसीसीआयच्या निवडणुकीत जगमोहन दालमियांचे निकटवर्तीय रणबीरसिंह महेंद्र यांनी अटीतटीच्या लढतीत पवारांचा पराभव केला.

sharad pawar | sarkarnama

शेतकरी कर्जमाफी

2008 साली 'यूपीए' सरकारमध्ये शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री होते. तेव्हा त्यांनी 72 हजार कोटींचं शेती कर्ज माफ केले. अशा कर्जमाफी याअगोदर देण्यात आली नव्हती.

sharad pawar | sarkarnama

महाविकास आघाडीचा प्रयोग

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं 84 तासांचं सरकार पडून 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी 'महाविकास आघाडी'चा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी पहिल्यांदा शिवसेने सोबत

sharad pawar | sarkarnama

राष्ट्रवादी फुटली

2 जुलै 2023 रोजी अचानकपणे अजित पवार यांनी मुंबईतील राजभवनात जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आणि राष्ट्रवादी मध्ये दोन गट पडले.

sharad pawar | sarkarnama

NEXT: छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री विष्णू देव साय नेमके आहेत तरी कोण?

येथे पहा