Sachin Fulpagare
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 28 फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सहभागी होणार नसल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.
राज्यसभा जागा लढवण्यासाठी आमच्याकडे संख्याबळ नाही. बहुमत नसल्याने निवडणूक लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही, असे शरद पवार म्हणाले.
भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे सहा उमेदवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.
जागावाटपावर चर्चा चांगली झाली आहे. जागा जिंकणं महत्त्वाचं असलं तरी ती जागा कशासाठी जिंकतोय हेही महत्त्वाचं असतं. 10 फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल, असे पवार म्हणाले.
'मविआ'चे जागावाटप कधी?
जागावाटपावर चर्चा चांगली झाली आहे. जागा जिंकणं महत्त्वाचं असलं तरी ती जागा कशासाठी जिंकतोय हेही महत्त्वाचं असतं. 10 फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल, असे पवार म्हणाले.
पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत आहेत. जसं गुजरातला सगळं देण्यासाठी ते धैर्य दाखवतात. तसं महाराष्ट्र राज्याला पण द्यावं, असे शरद पवार म्हणाले.