Vijaykumar Dudhale
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या 38 मिनिटांच्या भाषणात तब्बल 10 मिनिटे ही शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या 2014 मधील सरकारने मराठा आरक्षण दिले होते. त्यानंतर शरद पवारांचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर ते गेले. आताही भाजप सरकारने मराठा आरक्षण दिले आहे, पवारांचे सरकार आल्यावर ते पुन्हा गायब होणार आहे.
दूध भुकटीच्या आयातीसंदर्भातील निर्णयही शरद पवार यांचाच आहे, असे मला वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. शरद पवारांनीच तो निर्णय घेतलेला आहे.
आम्ही गेल्या दहा वर्षांत एक किलोही दूध पावडर आयात केलेली नाही. तसेच आगामी पाच वर्षांत एक ग्रॅमही दूध पावडर आम्ही आयात करणार नाही.
भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे शरद पवार हे सरगना आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्याचे काम शरद पवार यांनीच केले आहे.
‘यूपीए’च्या काळात महाराष्ट्राला एक लाख 91 हजार कोटी रुपये मिळाले होते. पण मोदी सरकारने महाराष्ट्राला दहा लाख पाच हजार कोटी रुपये दिले आहेत. तुमचा यावर विश्वास नसेल तर पवारसाहेब पुण्यातील कोणताही एक चौक निश्चित करा, आमचे मुरली मोहोळ तुम्हाला ‘पै ना पै’चा हिशेब देतील.
पवारसाहेब तुम्ही पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई या शहरासाठी काहीही केलेले नाही. या शहरांचा विकास नरेंद्र मोदी सरकारने केला, असा दावाही अमित शाह यांनी केला.
पवारसाहेब, तुम्ही दहा वर्षे कृषी आणि सहकार मंत्री होता. साखर कारखान्यांचा दहा हजार कोटी रुपयांचा प्राप्तीकर विभागाचा प्रश्न होता. तुम्ही तो सोडवू शकला नव्हता. मी सहकार मंत्री झाल्यानंतर मोदींकडे गेलो आणि अवघ्या दीड मिनिटात दहा हजार कोटींच्या प्राप्तीकराचा प्रश्न सोडवला.