Vijay Shivtare : पवारांचे एकेकाळचे कट्टर समर्थक ते कट्टर विरोधक : विजय शिवतारे

Vijaykumar Dudhale

मुंबईत व्यवसाय

मूळचे पुरंदर तालुक्यातील परिंचे येथील विजय शिवतारे हे व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत गेले होते. ते शरद पवार यांचे समर्थक होते. पवारांनी त्यांना मुंबईतील माहिम विधानसभेचे तिकीट दिले होते. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता.

Vijay Shivtare | Sarkarnama

पुरंदरमध्ये लक्ष

शिवतारे यांनी पुरंदरमध्ये 2007-2008 पासून लक्ष घालायला सुरुवात केली. त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले होते. त्याला शरद पवार यांना निमंत्रित केले होते. मात्र, पवार त्या कार्यक्रमाला आले नव्हते.

Vijay Shivtare | Sarkarnama

मेहुण्याचे तिकीट कापले आणि पवारांपासून दुरावत गेले

शिवतारे यांचे मेहुणे दिलीप यादव यांना जाहीर झालेले पंचायत समितीचे तिकीट ऐनवेळी कापले गेले आणि शिवतारे हे पवारांपासून अंतर राखून वागायला लागले.

Vijay Shivtare | Sarkarnama

शिवसेनेच्या तिकिटावर आमदार

शिवतारे यांनी 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पुरदंरमध्ये राष्ट्रवादीचे दिगंबर दुर्गाडे यांचा, तर 2014 मध्ये काँग्रेसचे संजय जगताप यांचा पराभव करून आमदार झाले होते.

Vijay Shivtare | Sarkarnama

अजितदादांचे चॅलेंज अन्‌ शिवतारेंचा पराभव

पुरंदरचे 2019ची निवडणूक महाराष्ट्रात गाजली होती, त्यात अजित पवार यांनी चॅलेंज देऊन विजय शिवतारे यांचा विधानसभेला पराभव केला होता. त्या निवडणुकीत पवारांनी काँग्रेसचे संजय जगताप यांना निवडून आणले होते.

Vijay Shivtare | Sarkarnama

बदला घेण्याची वेळ

मागील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची सल शिवतारे यांना होती. ती त्यांनी आज पुन्हा बोलून दाखवली आणि अजित पवार यांचा बदला घेण्याची वेळ आल्याचे जाहीर कार्यक्रमात आवाहन केले.

Vijay Shivtare | Sarkarnama

अजितदादांनी माफी मागावी

सासवड येथील पालखीतळावर येऊन गेल्या निवडणुकीत केलेल्या विधानाबद्दल अजित पवार यांनी पुरंदरच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणीही विजय शिवतारे यांनी केली.

Vijay Shivtare | Sarkarnama

बारामती लोकसभा लढण्याची घोषणा

विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष किंवा नरेंद्र मोदी विचार मंचच्या माध्यमातून लढविण्याची घोषणा केली.

R

Vijay Shivtare | Sarkarnama

वडील रिक्षाचालक, फी भरायला पैसे नव्हते; पण मेहनतीच्या बळावर बनले IAS

Ansar Shaikh | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा