Ganesh Sonawane
नवरी मिळे हिटलरला सारख्या अनेक मराठी टीव्ही मालिकांमधून भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्मिला शिंदे सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
तिने तिच्या इन्स्टाग्राम व फेसबुक अकाऊंटवर ती पोस्ट शेअर केलीय. ज्यामध्ये देशातल्या वा व्यक्तीच्या पॉवर (Power) वरून तिने आपले परखड मत मांडले आहे.
मुंबई महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मराठी अभिनेत्री शर्मिला शिंदे हिनं ही पोस्ट शेअर केली.
शर्मिला हिने लिहले आहे की, मला माझ्या देशात सगळ्यात जास्त चुकीचा वाटणारा शब्द आहे Power.
"अमुक अमुक पक्ष किंवा व्यक्ती देशात/राज्यात power मधे आहे" कशी काय!?
कुठल्याही लोकशाहीमधे जर कुणी power मधे असतं तर ती फक्त आणि फक्त जनता असते. बाकी सगळे आपण दिलेल्या पगारावरती काम करणारे जनतेचे सेवक आहेत.
माझ्या घरी स्लाइडिंग विंडोच काम करायला आलेल्या व्यक्तीला मी सांगते की मला विंडो कशी हवी आहे. तो नाही ठरवत की विंडो कशी असेल किंवा तो पैसे घेऊन विंडो बनवणारच नाही आहे.
नेमका मुंबईचा महापौर कोण होणार? याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या असताना शर्मिला शिंदे यांनी केलेली ही पोस्ट व्हायरल झाली आहे.