Deepak Kulkarni
माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी हे काँग्रेसमधील वजनदार नेत्यांपैकी एक होते.
आता त्यांच्या कन्या आणि माजी काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.
त्यांनी प्रणव मुखर्जी यांच्यावर “In Pranab, My Father: A Daughter Remembers” हे पुस्तक लिहिलं आहे.
शर्मिष्ठा मुखर्जी यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९६५ रोजी पश्चिम बंगाल येथे झाला.
त्या भारतीय कथ्थक नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शक आणि माजी काँग्रेस नेत्या आहेत .
यात त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधींबद्दलचे किस्से लिहिले आहेत.
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
तसेच प्रणव मुखर्जी पंतप्रधान का झाले नाहीत, याबद्दल मोठा गौप्यस्फोटदेखील पुस्तकात केला आहे.
या पुस्तकामध्ये प्रणव मुखर्जींचा जीवनप्रवास शर्मिष्ठा यांनी त्यांंच्याच डायरीमधील नोंदीच्या आधारे मुलीच्या नजरेतून मांडला आहे.