Rajanand More
शशी थरूर हे काँग्रेसचे केरळमधील तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. पक्षातील बुध्दीवादी नेत्यांमध्येही त्यांचा समावेश होतो.
थरूर यांनी यापूर्वी अनेकदा पक्षाला अडचणीत आणले आहे. पण सहा अशा घटना किंवा वाद आहेत, त्यामुळे त्यांच्यासह पक्षावरही नामुष्की ओढवली होती.
थरूर परराष्ट्र राज्यमंत्री असताना 2010 मध्ये त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांची कोच्ची आयपीएल टीममध्ये भागीदारी. थरूर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप. त्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता.
2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी सुनंदा पुष्कर यांचा गुढ मृत्यू झाला होता. त्यावेळी थरूर मनुष्यबळ विकास राज्यमंत्री होते. थरूर यांच्यामुळे पत्नीने आत्महत्या केल्याचा आरोप झाला होता. यामुळे काँग्रेस अडचणीत आली होती.
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वच्छ भारत अभियानावरून कौतुक केले होते. त्यामुळे त्यांना प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले होते.
‘हिंदू पाकिस्तान’ या थरूर यांच्या 2018 मधील विधानावरून मोठा वाद झाला होता. हा मुद्दा काँग्रेससाठी चांगलाच अडचणीचा ठरला. लोकसभा निवडणुकीत पक्षाला त्याचा फटका बसला.
थरूर यांनी 2022 मध्ये मल्लिकार्जून खर्गे यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही लढली. त्यामुळे गांधी कुटुंबाची नाराजी त्यांनी ओढवून घेतल्याची चर्चा होती. त्यावेळी थरूर यांनी फॅमिली रन पार्टी म्हणत सर्वांनाच धक्का दिला होता.
थरूर यांनी नुकतेच केरळमधील सीपीएम सरकारचे कौतुक केले होते. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यावरून पक्षाच्या धोरणाविरोधात विधान केल्याने काँग्रेसची कोंडी झाली होती.