Rashmi Mane
यंदाची लोकसभा निवडणूक देशासह राज्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कालच लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्यातील मतदान पार पडले.
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सातारा लोकसभेसाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी अर्जासोबत दिलेले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीचा आराखडा सादर केला आहे.
शशिकांत शिंदेंकडे तीन कोटी नऊ लाख रुपयांची जंगम, तर दोन कोटी 65 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. दहा कोटींची शेतजमीन असून, एक कोटी 14 लाखांच्या चार आलिशान गाड्या आहेत.
शशिकांत शिंदे यांनी 2022- 23 मध्ये 57 लाख 67 हजार रुपयांचे करप्राप्त उत्पन्न सादर केले आहे.
शिंदे यांच्या पत्नी वैशालीताई यांच्याकडील एक कोटी 46 हजार कर प्राप्त उत्पन्न सादर केले आहे.
...तर विविध बँकांमध्ये शशिकांत शिंदेंची 22 लाख 17 हजारांची ठेवी व शिल्लक रक्कम आहे, तर पत्नी वैशालींच्या नावे 29 लाख 93 हजार 131 रुपयांच्या ठेवी व शिल्लक रक्कम आहे.
विविध शेअर्स, म्युच्युअल फंड आदींमध्ये शशिकांत शिंदेंच्या नावे 84 लाख 98 हजारांची गुंतवणूक, तर पत्नी वैशालींच्या नावे सात कोटी 48 लाखांची गुंतवणूक आहे.
R