सरकारनामा ब्यूरो
शत्रुघ्न सिन्हा हे बॉलिवूडमधील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत.
नायक ते खलनायकाची प्रत्येक भूमिका जबरदस्तपणे निभावणारे राजकारणातील दमदार नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी राजकारणातही नाव कमावले आहे.
मूळचे बिहार येथील असून त्यांनी तेथील पटणा सायन्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
पुण्यातील 'एफटीआयआय'मधून शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या पहिला ‘प्रेम पुजारी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केले.
बॉलिवूड क्षेत्रात आपल्या दमदार आवाजाने ठसा उमटवत अनेक सुपरहिट चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या.
अभिनयाबरोबर राजकीय क्षेत्रातही मागे न राहणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी 1991 मध्ये भाजपत प्रवेश केला.
राज्यसभेचे सदस्य आणि केंद्रात मंत्री अशा अनेक महत्त्वाच्या राजकीय जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
काँग्रेसमध्ये 3 वर्षे काम करून त्यांनी 'टीएमसी'मध्ये प्रवेश केला अन् आपला राजकीय प्रवास सुरू ठेवला.