IAS Sheetal Teli-Ugale : पुणे विभागीय आयुक्तपदी शीतल तेली- उगले , अशी आहे प्रशासकीय कारकिर्द

Roshan More

विभागीय आयुक्त

भारतीय प्रशासकीय सेवेतील वरीष्ठ अधिकारी शीतल तेली-उगले यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.

IAS Sheetal Teli-Ugale

बदली

२००९ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या तेली यांचे राज्याच्या क्रीडा आयुक्त पदावरून पुणे विभागीय आयुक्त पदावर बदली

IAS Sheetal Teli-Ugale | sarkarnama

सुवर्ण पदक

त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला शाखा पदवी परीक्षेत सुवर्ण पदक मिळविले आहे.

विशेष प्रशिक्षणात सहभाग

त्यांनी प्रशासकीय सेवेदरम्यान २०२३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया सरकारांनी अर्थसहाय्यित व प्रायोजित केलेल्या, ‘जलसुरक्षा’ आणि 'वर्तुळाकार अर्थव्यवस्था' (सर्क्युलर इकॉनॉमी) या विषयांवर ऑस्ट्रेलिया येथे आयोजित विशेष प्रशिक्षणात सहभाग घेतला.

कारकीर्दची सुरुवात

त्यांची नागपूर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेतील कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी चंद्रपूर, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले.

क्रीडा आयुक्त

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त, आयुक्त वस्त्रोद्योग आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य हातमाग विकास महामंडळ, सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त आणि राज्याच्या क्रीडा आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.

स्मार्ट सिटी पुरस्कार

सोलापूर महापालिका आयुक्तपदाच्या कालावधीत २०२३ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सोलापूर स्मार्ट सिटीला एकूण कामगिरीसाठीचा पश्चिम विभागासाठीचा 'विभागीय स्मार्ट सिटी पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

IAS Sheetal Teli-Ugale | sarkarnama

NEXT : पक्षाच्याच नेत्यासोबत एकत्रित घेतला फ्लॅट? कोण आहेत वादात अडकलेल्या महिला खासदार?

Saayoni Ghosh | Sarkarnama
येथे क्लिक करा