Sunil Balasaheb Dhumal
शाहबाज शरीफ यांचा जन्म 23 सप्टेंबर 1951 रोजी लाहोरमधील पंजाबी भाषिक काश्मिरी कुटुंबात झाला.
शाहबाज यांनी लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेज युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये पदवी घेतली आहे.
1980 च्या दशकात त्यांनी मोठा भाऊ नवाज शरीफ यांच्यासोबत राजकारणात प्रवेश केला.
1988 मध्ये, नवाज पंजाबचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते पंजाब विधानसभेचे सदस्य बनले. तर 1997 मध्ये नवाझ शरीफ पंतप्रधान झाले, त्यावेळी ते पंजाबचे मुख्यमंत्री होते.
1999 मध्ये लष्करी उठाव झाल्याने शाहबाज यांनी कुटुंबासह सौदी अरेबियात आठ वर्षे आश्रय घेतला.
2007 मध्ये पाकिस्तानात आल्यानंतर 2008 आणि 2013 मध्ये शाहबाज पुन्हा पंजाबचे मुख्यमंत्री बनले.
पनामा पेपर्स प्रकरणात नवाझ शरीफ पायउतार झाल्यानंतर 2017 मध्ये शाहबाज पाकिस्तान मुस्लिम लीग (एन)चे अध्यक्ष झाले.
इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर शाहबाज विरोधी पक्षाचे नेते बनले.
मनी लाँड्रिंग आणि उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्नाच्या आरोपाखाली त्यांना अनेक महिने तुरुंगात घालवावे लागले.