Sunil Balasaheb Dhumal
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारताच्या दौऱ्यावर आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर परदेशी नेत्याची ही पहिलीच ठरली.
नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांचे स्वागत केले.
या भेटीत हैदराबाद हाऊसमध्ये भारत आणि बांगलादेशने 10 करारांवर स्वाक्षरी केली.
शेख हसीना यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.
बांगलादेशचे पंतप्रधान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेतली.
या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होण्यात मदत होईल, असे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी म्हटले.