Jagdish Patil
भाजपचे उमेदवार कॅप्टन अभिमन्यू यांच्याजवळ 417 कोटींची संपत्ती असून ते सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.
त्यांच्याकडे 369.03 कोटी रुपयांची जंगम तर 47.96 कोटींची स्थावर मालमत्ता आहे.
यासह 1.1 लाख रुपयांची रोकड आणि बाँड शेअर्समध्ये 251 कोटींची गुंतवणूक आहे. सोन्याचे दागिने व अन्य मौल्यवान वस्तू असा 21.53 लाखांचा ऐवज आहे.
भाजपचे उमेदवारनंतर हिसारमधील अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
जिंदाल यांच्याकडे 270 कोटींची संपत्ती आहे. त्यापैकी 190 कोटींची जंगम आणि 80 कोटींची स्थावर मालमत्ता आहे.
तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा आहेत.
भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्याकडे 26.48 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
त्यांच्याकडे कोणतीही गाडी नाही. मात्र, एक रायफल आणि एक पिस्तूल आहे.