Kuwait New Ruler Sheikh Meshal : कुवेतला मिळाला नवा शासक; शेख मेशाल यांची संपत्ती ऐकून व्हाल अचंबित!

Chetan Zadpe

नवे अमीर (शासक) -

कुवेतचे अमीर शेख नवाफ अल अहमद अल सबाह यांच्या निधनानंतर त्यांचा भाऊ शेख मेशाल यांना नवीन अमीर म्हणजेच शासक घोषित करण्यात आले आहे.

राज्यघटना -

कुवेतच्या राज्यघटनेनुसार पूर्वीचा अमीर अक्षम किंवा निधन पावल्यास क्राउन ऑफ प्रिन्स हा नवा अमीर बनतो.

क्राउन ऑफ प्रिन्स -

तीन वर्षांपूर्वी क्राउन ऑफ प्रिन्स होण्यापूर्वी, शेख मेशाल यांनी आपली कारकिर्द आखाती राज्याच्या संरक्षणासाठी समर्पित केले होते.

कुवेतवर मेशाल यांच्या कुटुंबाचं राज्य -

शेख मेशाल हे शेख नवाफ अल-अहमद अल-सबाह यांचा धाकटे बंधू आणि शेख अहमद अल-जाबेर अल-सबाह यांचे सातवे अपत्य आहे, ज्यांनी 1921 ते 1951 पर्यंत कुवेतवर राज्य केले.

ब्रिटनमध्ये शिक्षण -

कुवेतचे नवे अमीर शेख मेशाल यांचा जन्म 1940 मध्ये झाला. त्यांनी 1960 मध्ये ब्रिटिश हेंडन पोलिस कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि देशातील महत्त्वाच्या सुरक्षा पदांवर काम केले.

अफाट संपत्ती -

शेख मेशालच्या कुटुंबाने 1752 पासून कुवेतवर राज्य केले आहे. 1991 मध्ये, कुवेतच्या राजघराण्याची किंमत 90 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती.

360 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे मालक -

शेअर्स आणि त्याचे मूल् वाढल्यामुळे, आज मेशाल यांच्या कुटुंबाजवळ अंदाजे 360 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी संपत्ती आहे.

TEXT : जेलमधून निवडणूक लढले अन् आमदार-खासदार झाले; पाहा खास फोटो!