Roshan More
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा पराभव करत भाजपने मोठा विजय मिळवला आहे.
दिल्लीमध्ये तब्बल 27 वर्षानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे.
सुषमा स्वराज यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भुषवले आहे. यावेळी देखील चार महिला नेत्यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये शिखा राॅय यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी आपचे सौरभ भारद्वाज यांचा पराभव केला. त्या व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठातून एलएलबी केले आहे.
शालीमार बाग मतदारसंघातून विजयी झालेल्या रेखा गुप्ता यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत समाविष्ट आहे.
वजीरपूर मतदारसंघातून पूनम शर्मा यांचे नाव घेतली मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे.
नीलम पहलवान या नजफगड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्या देखील मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार मानल्या जात आहेत.