Mangesh Mahale
गेल्या अनेक दिवसांपासून तपस रॉय हे तृणमूल काँग्रेसवर नाराज होते.
जानेवारीत पीडीएस घोटाळ्यात ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला होता.
ईडीच्या छाप्यानंतर मुख्यमंत्री ममतांनी त्यांच्या समर्थनार्थ कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
तृणमूलच्या ज्या नेत्यांवर ईडीने कारवाई केली. त्या नेत्यांच्या पाठीशी ममता उभ्या राहिल्या होत्या.
काँग्रेस सोडल्यानंतर ममतांनी 'तृणमूल'ची स्थापना केली, तेव्हा रॉय यांनीही तृणमूलमध्ये प्रवेश केला होता.
ममता यांच्या सरकारमध्ये ते काही काळ मंत्री होते. काही दिवसांनंतर त्यांना पदावरून हटविण्यात आले.
काही दिवसांपूर्वी त्यांना उत्तर कोलकाता जिल्हाध्यक्षपदावरूनही हटविण्यात आले.
पक्षात आपला सन्मान होत नाही, असा मला अनेकदा अनुभव आला, असे त्यांनी राजीनाम्यानंतर सांगितले.
तृणमूल काँग्रेसची कार्यपद्धती आणि विचारधारा यांच्यावर त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
तृणमूलवर होत असलेल्या भष्ट्राचाराच्या आरोपांवर उत्तर देत त्रस्त झालो होतो, असे ते म्हणाले.
ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.