सरकारनामा ब्यूरो
ज्योतिरादित्य शिंदे यांनी पत्नी प्रियदर्शिनी, मुलगा महाआर्यमन याच्यासह ज्योतिबा, तुळजा भवानी, विठ्ठल-रूक्मिणी, अंबाबाई यांच्या चरणी मुलांच्या लग्नाची पत्रिका अर्पण केली.
सोलापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानीचे त्यांनी दर्शन घेतले.
बीड येथील वली हजरत मंसूर शाह दरगाहवर ज्योतिरादित्य आणि मुलगा महाआर्यमन यांनी चादर वाहिली.
पंढरपूर येथे त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी मुलगा महाआर्यन यांच्या लग्नपत्रिका अर्पण करत दर्शन घेतले.
कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिराच्या परिसरात असलेल्या यमाई देवी मंदिरात जाऊन त्यांनी आशीर्वाद घेतला.
चोपदाई देवीच्या मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी पुजाऱ्यांनी त्यांना नारळ आणि शाल भेट दिली.
महाराज दौलतराव शिंदे या आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या केदारेश्वर मंदिरात ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह पूजा केली.
कोल्हापूर येथील दख्खनचा राजा म्हणून ओळखले जाणार ज्योतिबा देवस्थानात त्यांनी महाआरती केली.
महादजी शिंदे यांचे दर्शन घेत त्यांना विनम्र अभिवादन केले.