सरकारनामा ब्यूरो
शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे.
यावर्षी पहिल्यांदाच हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
शिवछत्रपतींचे वंशज आणि शिवभक्तांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर केला आहे.
साताऱ्यामध्ये हा पुरस्कार यंदाच्या वर्षापासून सुरू करण्यात आला आहे.
19 फेब्रुवारीला सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य दिव्य असा सोहळा साजरा होणार आहे.
या सोहळ्याच्या दिवशी पंतप्रधानांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात येणार आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने खासदार उदयनराजे भोसले यांनी तेथील सैनिक स्कुलची पाहणी केली.