Deepak Kulkarni
बच्चू कडू हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बुलंद तोफ आहेत. आंदोलनात्मक राजकारण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील भूमिका आणि दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी त्यांनी मोठी चळवळ उभी केली आहे.
कडू हे चारवेळा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी 2026 मध्ये प्रवेश करून विधान परिषदेवर आमदारकी मिळवली.
शिवसेना आमदार बच्चू कडूंसह सहा जणांवर घुग्घुस पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार कडू यांनी विनापरवानगी आंदोलन व पोलिसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
त्याचं झालं असं की, बच्चू कडू यांनी स्थानिक भूमिपुत्रांना वेकोलिमध्ये 80 टक्के नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी रविवारी (18 ऑक्टोबर) एक मोर्चा आयोजित केला होता.
विनापरवानगी मोर्चा काढणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि भाषणादरम्यान पोलीस प्रशासन व तहसीलदारांविषयी अत्यंत प्रक्षोभक, अश्लील वक्तव्य करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
बच्चू कडू यांचं राजकारण प्रामुख्याने शेतकरी, दिव्यांग व्यक्ती आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांभोवती केंद्रित राहिले आहे. त्यांनी अपक्ष आमदार ते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, मंत्री आणि आता शिवसेनेचे विधान परिषद सदस्य असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
NEXT: निळी साडी अन् हातात AK-47! IPS अंकिता शर्मांचा हा 'दबंग' अंदाज पाहिलाय का? फोटो तुफान व्हायरल
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.