Hibanama: ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन 'गिफ्ट' मिळवून देणारा 'हिबानामा' काय प्रकार आहे...?

Deepak Kulkarni

ड्रायव्हरचं पालटलं नशीब

शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांचे ड्रायव्हर असलेल्या जावेद रसूलचं नशीबच पालटलं आहे.

sandipanrao bhumre | Sarkarnama

150 कोटींची तीन एकर जमीन भेट

हैदराबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशजांकडून भुमरे यांचे चालक जावेद रसूल यांना तब्बल 150 कोटींची तीन एकर जमीन भेट म्हणून देण्यात आली आहे.

hibanama | Sarkarnama

'हिबानामा' करार

आता सालार जंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या 'हिबानामा' कराराची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

deed of gift | Sarkarnama

कायदेशीर दस्तऐवज

हिबानामा हा एक कायदेशीर दस्तऐवज मानला जातो.

deed of gift | Sarkarnama

आर्थिक देवाण-घेवाण न करता भेट

हिबानामाद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता जमीन, घर, दागिने यांसारख्या विविध वस्तूंचं दुसऱ्या व्यक्तीला निःस्वार्थपणे, म्हणजे कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण न करता, भेट स्वरूपात देऊ शकतो.

Hibanama | Sarkarnama

कायदेशीर व्यवहारातही वापर

हिबा हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ भेट देणे आहे. मुस्लीम कायद्यात हिबा संकल्पनेला प्रचंड महत्त्वाची मानली जाते. काही प्रसंगी ही संकल्पना सर्वसामान्य कायदेशीर व्यवहारातही वापरली जाते.

Hibanama | Sarkarnama

हिबानामा करता येत नाही रद्द

हिबानामा झाल्यावर तो न्यायालयाच्या परवानगीशिवाय रद्द करता येत नाही.

Deed Of Gift | Sarkarnama

...तर हिबानामा नोंदवणे बंधनकारक

कायद्यानुसार 100 रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या अचल मालमत्तेसाठी हिबानामा नोंदवणे बंधनकारक असून तो स्टॅम्प पेपरवर तयार होतो. तसेच या हिबानामासाठी स्टॅम्प ड्युटीही भरावी लागते.

Deed Of Gift | Sarkarnama

हिबा भेट देण्यासाठीचा नियम

हिबा नातेवाईक,मित्र, परकी व्यक्ती, संस्था यांना दिला जातो. पण तो स्वीकारण्यास संबंधित व्यक्ती व संस्था सक्षम असणे अनिवार्य असते. याचवेळी हिबासाठी संबंधित मालमत्ता हस्तांतरणासाठी योग्य असावी असाही नियम आहे.

Hibanama | Sarkarnama

NEXT : ॲमेझॉनच्या मालकाचा शाही विवाह! खर्च 400 कोटी; 12 कोटींचा लेहेंगा, VIPसाठी 90 खासगी जेट

Jeff Bezos Wedding | Sarkarnama
येथे क्लिक करा...