Jagdish Patil
अमेरिका-इराणमधील युद्ध संपण्यासाठी १९ जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये करार होणार असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केली.
मात्र दोन्ही देशातील हा शांतता करार प्रत्यक्षात आणण्यासाठी जे चेहरे प्रत्यक्ष आणि पडद्यामागून सक्रिय होते, त्या व्यक्तींबद्दल जाणून घेऊया.
ट्रम्प सुरुवातीला प्रचंड आक्रमक आणि नंतर युद्ध संपविण्यासाठी तसंच, दुसऱ्या कार्यकाळातील परराष्ट्र धोरणात्मक यश म्हणून या करारासाठी ते गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील होते.
उपाध्यक्ष व्हान्स हे पाकिस्तानातील चर्चेपासून उदयास येणाऱ्या कराराचा पाया असलेल्या १४ कलमी कराराच्या अटींवरील चर्चेत सक्रिय सहभागी होते.
ट्रम्प यांचे विशेष दूत विटकॉफ यांनी इराणी प्रतिनिधींबरोबरील पडद्यामागील चर्चांच्या पथकाचे नेतृत्व केले. पाकिस्तानी मध्यस्थांसोबत त्यांनी कराराचा आराखडा तयार केला.
ट्रम्प यांचे जावई जॅरेड क्रुश्नर यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील पश्चिम आशियातील संपर्कांचा उपयोग करून वाटाघाटी सुलभ करण्यात मदत केली.
लारिजानी हे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव होते. खामेनेई यांच्या हत्येनंतर ते प्रत्यक्षात इराणचे नेतृत्व करत होते; पण मार्चमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची हे इराणच्या परराष्ट्र धोरणातील प्रभावशाली व्यक्ती म्हणून पुढे आले. विविध देशांशी इराणचे संबंध व्यवस्थापित करण्यात त्यांनी भूमिका बजावली.
पाकचे लष्करप्रमुख मुनीर यांनी मध्यस्थीच्या प्रयत्नांना दिशा देण्यात निर्णायक भूमिका बजावली. अनेक वर्षांतील ही पाकिस्तानची ही महत्त्वाची राजनैतिक मध्यस्थी होती.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या चर्चेमध्ये मध्यस्थ म्हणून भूमिका बजावली. त्यांनीच हा करार अंतिम होणार असल्याचं सांगितलं.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ, इराणचे अराघचींसह जगभरातील अनेक देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली.
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी पाकच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अनेक वेळा तेहरानला भेट दिली. विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या भेटींना महत्त्वाचे पाऊल मानले गेले.