सरकारनामा ब्युरो
दिल्लीतील एनआयए मुख्यालयात एक छोटी पण अत्यंत सुरक्षित कोठडी सध्या देशभरात चर्चेत आहे.
ही कोठडी केवळ 14 फूट बाय 14 फूट असून आणि ती सीसीटीव्हीअंतर्गत व सतत तैनात सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली आहे.
याच कोठडीमध्ये मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वर राणा याची रवानगी करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
या कोठडीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दिल्ली पोलिस व निमलष्करी दल मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत.
राणाच्या कोठडीत मल्टी-लेयर डिजिटल सिक्युरिटी सिस्टीम बसवण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक कोनातून निरीक्षण करत आहेत.
केवळ 12 अधिकृत एनआएचे अधिकारीच आत प्रवेश करू शकतात. इतर कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही.
जमिनीवर एक साधा पलंग ठेवण्यात आला आहे आणि कोठडीतच एक बाथरूम आहे, त्यामुळे त्याची हालचाल मर्यादित राहते.
सर्व मूलभूत गरजा, साधे जेवण, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा या कोठडीतच पुरवण्यात येणार आहेत.