Shivajirao Aadhalrao Patil: पाच वर्षांच्या यशचं 'आजोबा' आढळरावांना लय भारी गिफ्ट!

Deepak Kulkarni

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी...

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन अजितदादांनी उमेदवारी दिली आहे.

Shivajirao Aadhalrao Patil

कोल्हे- आढळराव लढत...

शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार या पक्षाने अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेची केली आहे.

Shivajirao Aadhalrao Patil

प्रचार धुमधडाक्यात

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाटील पुन्हा मैदानात उतरले असून धुमधडाक्यात प्रचार सुरू आहे.

Shivajirao Aadhalrao Patil

आंबेगाव दौऱ्यावर...

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील त्यांचाच तालुका असलेल्या आंबेगावच्या गावभेट दौऱ्यावर होते.

Shivajirao Aadhalrao Patil

उमेदवारच नव्हे तर उपस्थितही गहिवरले

त्यावेळी लौकी गावात त्यांना सुधीर पंढरीनाथ थोरात या शहीद जवानाच्या पाच वर्षाच्या मुलाने दिलेल्या अभिनव शुभेच्छा पाहून उमेदवारच नव्हे तर उपस्थितही गहिवरले.

Shivajirao Aadhalrao Patil

आजोबा उल्लेख...

शुभेच्छा पत्रासोबत या बालकाने आजोबा म्हणणाऱ्या आढळरावांना चॉकलेट सुद्धा दिले.

Shivajirao Aadhalrao Patil

यश सुधीर थोरात

यश सुधीर थोरात असे या बालकाचे नाव असून तो `केजी`त आहे. त्याचे लष्करात असलेले वडील सुधीर पंढरीनाथ थोरात हे गेल्यावर्षी शहीद झाले.

Shivajirao Aadhalrao Patil

शिक्षणासाठी दत्तक

त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या लौकी या गावी आढळरावांनी यशला शिक्षणासाठी दत्तक घेतल्याचे जाहीर केले.

Shivajirao Aadhalrao Patil

आजोबांना भेटण्याचा हट्ट

आढळरावांचा आज थोरातांच्या लौकीत शिरूर लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त गावभेट दौरा होता. हे यशला समजताच त्याने आपल्या या आजोबांना भेटण्याचा हट्ट आपली आई तथा वीरपत्नी अश्विनी थोरात यांच्याकडे धरला.

Shivajirao Aadhalrao Patil

NEXT : 'हे' दिग्गज नेते लोकसभेवर बिनविरोध विजयी