Shivajirao Nalawade Story : अजित पवार गटाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी; कोण आहेत शिवाजीराव नलावडे?

Deepak Kulkarni

4 जागांसाठी निवडणुकीची घोषणा

राज्यात विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.

Vidhan Bhavan | Sarkarnama

या 4 जागांसाठी निवडणूक

कोकण पदवीधर मतदारसंघ, नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार या 4 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

Vidhan Parishad Election | Sarkarnama

मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी (ता.28) मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला.

Ajit Pawar | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक

अजित पवार गटाकडून मुंबई शिक्षक पदवीधरच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले शिवाजीराव नलावडे हे राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत.

Shivajirao Nalawade | Sarkarnama

दोनदा विधानसभेच्या रिंगणात...

नलावडे यांनी या अगोदर दोनदा पूर्व उपनगरातून विधानसभा निवडणूक लढली आहेत.

Shivajirao Nalawade | Sarkarnama

पदवीधरच्या निवडणुकीत पराभव...

पदवीधर मतदारसंघाचीही निवडणूक नलावडे यांनी लढली आहे. मात्र, त्यांना यश मिळवता आले नव्हते.

Shivajirao Nalawade | Sarkarnama

सहकार क्षेत्रात त्यांचं मोठं नाव

सहकार क्षेत्रात त्यांचं मोठं नाव असून त्यामुळेच त्यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Shivajirao Nalawade | Sarkarnama

निवडणूक ताकदीने लढवणार..

यंदाची मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचं शिवाजीराव नलावडे यांनी सांगितलं आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

संधीचं सोनं करणार

नलावडे सध्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असून या निवडणुकीत पक्षनेतृत्वाने दिलेल्या संधीचं सोनं करणार असल्याचा निर्धार त्यांंनी बोलून दाखवला आहे.

Shivajirao Nalawade | Sarkarnama

NEXT : 534 वर्षांचं झालं अहमदनगर, जाणून घ्या शहराचा इतिहास