Rashmi Mane
शिवकालीन काळातील खगोलशास्त्रीय उपकरण – स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाला साक्ष देणारा शोध!
शिवाजी महाराजांनी वसवलेला रायगड किल्ला इतिहास, विज्ञान आणि वास्तुशिल्प यांचा संगम! सध्या येथे पुरातत्त्व खात्याचे उत्खनन सुरू आहे.
कुशावर्त तलावाजवळ उत्खननात सापडले प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण – यंत्रराज सौम्ययंत्र (Astrolabe).
दिशांचा वेध घेणारे, ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणारे, वेळ मोजणारे अक्षांश-रेखांश समजणारे उपकरण.
यंत्रावर कोरलेली अक्षरे, कासव व सापसदृश प्राणी "मुख" व "पुछ" या शब्दांतून दिशांचे संकेत उत्तर-दक्षिण ओळखण्याचे तंत्र!
शिवकालात खगोलशास्त्राचा वापर केला आहे. तसेच दुर्गाची रचना करताना वैज्ञानिक पद्धतींचा आधार घेतला आहे. यंत्रराज त्याचा ठोस पुरावा आहे.
या शोधामुळे ऐतिहासिक आणि वैज्ञानिक अभ्यासाला चालना मिळाली आहे. नव्या संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संधी आहे.