केंद्रीय कृषिमंत्र्यांची शेतीतून लाखो रुपयांची कमाई; काय-काय पिकते?

Rajanand More

शिवराज सिंह चौहान

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये कृषी मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे.

Shivraj Singh Chouhan | Sarkarnama

शेतीची आवड

शिवराज सिंह चौहान यांना शेतीची प्रचंड आवड असून ते स्वत: अजूनही शेतामध्ये फेरफटका मारताना दिसतात. कधी ट्रॅक्टर चालवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल होतात.

Shivraj Singh Chouhan | Sarkarnama

फॉर्म हाऊस

मध्य प्रदेशातील विदिशा हे त्यांचे गाव असून तिथेच त्यांची शेती आहे. या शेतात भलेमोठे फॉर्महाऊस असून त्यावरून काँग्रेसकडून त्यांच्यावर टीकाही केली जाते.

Shivraj Singh Chouhan | Sarkarnama

काय आहे शेतीत?

चौहान यांच्या शेतामध्ये टोमॅटो, शिमला मिरची, दुधी भोपळा, लाल भोपळा या फळभाज्यांसह झेंडू व इतर फुलांची शेतीही आहे. शेती उत्पादनातून ते लाखो रुपये कमावतात.

Shivraj Singh Chouhan | Sarkarnama

शेतीची पाहणी

कृषी मंत्री अनेकदा शेतात फेरफटका मारताना दिसतात. कधी पत्नीसोबत तर कधी शेतात काम करणाऱ्या मंजुरांसोबत त्यांचे फोटो समोर येत असतात.

Shivraj Singh Chouhan | Sarkarnama

आनंद मिळतो

शेतामध्ये काम करताना अद्भूत आनंद मिळतो, अशी भावना ते व्यक्त करतात. त्यामुळे शेतात सातत्याने येत असल्याचेही ते सांगतात.

Shivraj Singh Chouhan | Sarkarnama

साधेपणा

चौहान यांचा साधेपणा सर्वांनाच भावतो. मध्य प्रदेशात त्यांना मामा असे संबोधले जाते. शेतामधील त्यांचा अत्यंत सहज वावरही या साधेपणाचाच एक भाग आहे.

Shivraj Singh Chouhan | Sarkarnama

माहितीचा खजिना

शेतीशी संबंधित माहितीचा खजिनाच चौहान यांच्याकडे आहे. कृषिमंत्री म्हणून संसदेत आणि संसदेबाहेर भाषण करताना त्याची नेहमीच प्रचिती येते. वृक्षारोपणावरही त्यांचा भर असतो.

Shivraj Singh Chouhan | Sarkarnama

NEXT : देशाच्या शत्रूला ‘या’ दोन दबंग अधिकाऱ्यांनी आणलं भारतात; कोण आहेत हे IPS?

येथे क्लिक करा.