Mangesh Mahale
'द फ्री प्रेस जर्नल'मधून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये त्यांची व्यंगचित्रेही प्रसिद्ध झाली.
१९६० मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली. 'मार्मिक' नावाने स्वतःचे राजकीय मासिक सुरू केले.
बाळासाहेबांवर त्यांच्या वडिलांच्या (प्रबोधनकार ठाकरे) विचारसरणीचा प्रभाव होता.
१९६६ मध्ये त्यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला. त्यांनी १९८९ मध्ये 'सामना' हे वृत्तपत्र सुरू केले.
कट्टर हिंदुत्ववादी नेते अशी त्यांची ओळख आहे.
निवडणूक लढवली नाही, राजकीय पद स्वीकारले नाही, तरीही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली.
महाराष्ट्र फक्त मराठी माणसांचा आहे,असे त्यांचे मत होते.
मुंबईला आपला बालेकिल्ला मानणारे बाळासाहेब अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले.
मनोहर जोशी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असले तरी रिमोट मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राहिला.
आजच्याच दिवशी १७ नोव्हेंबरला २०१२ ला वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.