Rashmi Mane
मराठी माणसांच्या हक्कांसाठी, अन्यायाविरुद्ध उभारलेला हुंकार म्हणजे शिवसेना. 5 दशकांची संघर्षमय वाटचाल आणि आजचा अभूतपूर्व संघर्ष...
19 जून 1966 शिवाजी पार्कात प्रबोधनकार ठाकरे यांनी घोषणा केली. “मी माझा बाळ या महाराष्ट्राला देतोय!” त्याच दिवशी ‘शिवसेना’ या चळवळीचा जन्म झाला.
बाळासाहेब संघटना काढणार का, असं प्रबोधनकारांनी विचारलं. नाव काय? – उत्तर येण्याआधीच त्यांनी ठामपणे सांगितलं – “शिवसेना” छत्रपतींच्या नावाने मराठी अस्मितेची सेना!
मार्मिकमधील फटकारे, “वाचा आणि थंड बसा”, आणि डरकाळी फोडणारा वाघ – बाळासाहेब ठाकरे यांनी शब्दांतून व व्यंगचित्रातून मराठी जनतेचा आवाज जागा केला.
शिवसेना पहिल्यांदा निवडणुकीत उतरली तेव्हा त्यांच्याकडे 'धनुष्यबाण' हे चिन्ह नव्हते.
त्यावेळी अपक्ष उमेदवार किंवा इतर चिन्हांखाली लढले होते.
1985 मध्ये शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी गेली. तेव्हा निवडणूक आयोगाने त्यांना ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह दिलं.
शिवसेनेने ‘डरकाळी फोडणारा वाघ’ ओळख ठरवली. पण आयोगाकडून ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळालं. चिन्हाचं प्रतिकात्मक महत्त्व म्हणजे ‘धनुष्यबाण’ हे रामाच्या शौर्याचं प्रतीक मानलं जातं. हे हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचं प्रतिक म्हणून पुढे आलं.
बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे चिन्ह महाराष्ट्रात लोकप्रिय झालं.
ते केवळ चिन्ह नव्हतं, तर शिवसेनेच्या संघर्षाची ओळख बनलं. सध्या सत्तेच्या खेळी जरी सुरू असल्या तरी शिवसेना ही अजूनही लाखोंच्या हृदयात पेटती मशाल आहे.