सरकारनामा ब्यूरो
आमदार दादा भुसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती.
शिवसेना नेते दादा भुसे हे 13 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.
ते मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
धुळ्याच्या शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमधून डिप्लोमा केला.
नाशिक जिल्ह्यात मतदारसंघ असलेल्या भुसे यांची विधानसभा सदस्य म्हणून ही चौथी टर्म चालू आहे.
2014 मध्ये त्यांची सहकार राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती.
त्याचवेळी त्यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीही करण्यात आले होते.
राजकारणातील प्रवाहाविरुद्ध जाणारे तसेच कणखर भूमिका मांडणारे नेते अशी त्यांची ओळख आहे.
R