सरकारनामा ब्यूरो
सुषमा अंधारे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1984 ला लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे झाला.
वकील असलेल्या सुषमा अंधारे यांचे शिक्षण एम.ए. आणि बी.एड. झाले असून, त्या 'पीएचडी'चा अभ्यास करत आहेत.
सुषमा अंधारे या उत्तम लेखिका तसेच उत्कृष्ट भाषणशैलीमुळे त्या महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचल्या आहेत.
शिवसेनेची ढाल बनलेल्या सुषमा अंधारे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि त्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
सुषमा अंधारे या सरकारी नोकरी सोडत सामाजिक न्यायहक्कासाठी लढणाऱ्या महिला कार्यकर्त्या आहेत.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ठाम भूमिका मांडणाऱ्या आणि स्पष्ट वक्तव्यामुळे सुषमा अंधारे या जनतेत अधिक बहुचर्चित आहेत.
उत्तम वक्तृत्व शैलीमुळे महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या आहेत.
शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी सरकारी नोकरी सोडून जनतेला राज्यघटनेतील हक्कांची जाणीव व्हावी, यासाठी गणराज्य संघात काम करत होत्या.