Amol Sutar
शिवसेनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन कोल्हापूरमध्ये शुक्रवारपासून (ता. 16) सुरू झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाअधिवेशनाचे उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्र्यांसह या अधिवेशनासाठी 9 मंत्री, 43 आमदार, 13 खासदार आणि दोन हजाराहून अधिक शिवसैनिक कोल्हापुरामध्ये उपस्थित झाले आहेत.
या अधिवेशनात शिंदे शिवसेनेने उद्धव ठाकरेंना टीकेचे लक्ष्य केले. या वेळी उपस्थित रामदास कदम यांनी थेट घरी भांडी घासण्याचा घणाघात ठाकरेंवर केला.
अधिवेशनासाठी जिल्ह्यातील सुमारे 100 हून अधिक हॉटेलमधील दोन हजार खोल्यांचे बुकिंग शिवसेनेकडून करण्यात आले आहे.
महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
ज्या वेळी लोकसभा - विधानसभा निवडणूक लागतात, त्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच करत होते.
या अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. या वेळी शिवसैनिकांनी शपथ ग्रहण केली.
शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गांधी मैदानात जाहीर सभा होणार आहे. या सभेने अधिवेशनाची सांगता होईल.
R