Jagdish Patil
शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांना आयकर विभागाने नोटीस धाडल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
नोटीस आल्यामुळे आता त्यांची संपत्ती चर्चेत आली आहे. तर शिरसाट यांची एकूण संपत्तीची किती आहे ते जाणून घेऊया.
छत्रपती संभाजीनगरमधील व्हिट्स हॉटेल खरेदी प्रकरणामुळे मंत्री शिरसाट अडचणीत सापडले.
110 कोटी किंमतीचं व्हिट्स हॉटेल शिरसाट यांच्या मुलाने 67 कोटींना खरेदी करण्याचा प्रयत्न केला.
हाच मुद्दा विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश दिले. त्यांनंतर शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस आली.
शिरसाटांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान सादर केलेल्या संपत्ती विवरणपत्रानुसार मागील 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
2019 साली त्यांची जंगम संपत्ती 1.21 कोटी होती. ती 2024 मध्ये 13.37 इतकी झाली.
तर स्थावर संपत्ती 1.24 कोटीवरून 19.65 कोटी इतकी झाली आहे.
सन 2019 मध्ये त्यांच्याकडे 16 कोटी रुपये किमतीचे सोने होते. ते सन 2024 मध्ये 1 कोटी 42 लाखांचे असल्याचे त्यांनी विवरणपत्रात नमूद केले होते.