Sachin Ahir Birthday: मुंबईतील एकेकाळचे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार होते 'हे' नेते...

सरकारनामा ब्यूरो

शिवसेना ठाकरे गट नेते

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले सचिन अहिर हे आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत.

Sachin Ahir | Sarkarnama

काॅमर्स पदवीधर

मुंबईच्या श्रीमती एम.एम.के. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकाॅनॉमिक्समधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले.

Sachin Ahir | Sarkarnama

छगन भुजबळ यांच्या जवळचे

मोहन गंगाराम अहिर हे त्यांचे वडील तर अरुण गवळी यांचे ते पुतणे आहेत. सचिन अहिर हे छगन भुजबळ यांच्या अत्यंत जवळचे मानले जात.

Sachin Ahir | Sarkarnama

बॉडीगार्ड म्हणून केलं काम

सुरुवातीच्या काळात खटाऊ फॅब्रिक्स ग्रुपचे चेअरमन सुनीत खटाऊ यांचे वैयक्तिक सहायक आणि अंगरक्षक म्हणून त्यांनी काम केले.

Sachin Ahir | Sarkarnama

राष्ट्रवादीचे एकमेव आमदार

1999 मध्ये शिवडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्या दशकात ते मुंबईतून राष्ट्रवादीचे एकमेव आमदार होते.

Sachin Ahir | Sarkarnama

राज्यमंत्रिपद भूषवले

राज्यमंत्रिमंडळात गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधारणा, घर दुरुस्ती आणि पुनर्बांधणी यांसारख्या विविध पदांवर त्यांनी काम केले.

Sachin Ahir | Sarkarnama

श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट

अहिर आणि त्यांच्या पत्नीने श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. ही संस्था वरळी येथे गोविंदा उत्सवादरम्यान दहीहंडी कार्यक्रम आयोजित करते.

Sachin Ahir | Sarkarnama

तीनदा आमदार अन् पक्षाला राम राम

तीनदा आमदार राहिलेले अहिर हे मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी असताना 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.

R

Sachin Ahir | Sarkarnama

Next : भाजपचा 'हा' नाराज खासदार महाविकास आघाडीच्या वाटेवर..?

येथे क्लिक करा