Loksabha Election 2024 : भाजपचा 'हा' नाराज खासदार महाविकास आघाडीच्या वाटेवर..?

Deepak Kulkarni

तिकीट कट...

भाजपने जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले आहे.

Unmesh Patil | Sarkarnama

टॉप टेन खासदारांमध्ये समावेश

जळगावचे भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील यांचा देशातील टॉप टेन खासदारांमध्ये समावेश आहे.

Unmesh Patil | Sarkarnama

स्मिता वाघ यांना उमेदवारी

भाजपने उन्मेष पाटलांना घरी बसवत या ठिकाणी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. 

Unmesh Patil | Sarkarnama

समर्थक नाराज

हा निर्णय खासदार पाटील यांच्या समर्थकांना नाराज करणारा ठरला आहे. 

Unmesh Patil | Sarkarnama

2019 मध्ये ऐनवेळी पाटील यांना उमेदवारी

माजी आमदार स्मिता वाघ यांना 2019 मध्ये उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, ऐनवेळी पक्षांतर्गत राजकीय डावपेचात स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यावरून मोठा वादही झाला होता.

Unmesh Patil | Sarkarnama

महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा

उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा जळगावमध्ये रंगू लागल्या आहेत. 

Unmesh Patil | Sarkarnama

मुंबईत तळ ठोकून

उन्मेष पाटील हे मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असल्याची चर्चा आहे. 

Unmesh Patil | Sarkarnama

ठाकरेंची भेट

शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची पाटील यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. 

Unmesh Patil | Sarkarnama

मी भाजपचा कार्यकर्ता

...पण याचवेळी उन्मेष पाटील यांनी आपण कुणाचीही भेट घेतलेली नसून, मी भाजपचा कार्यकर्ता असून, प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

R

Unmesh Patil | Sarkarnama

NEXT: 17 वर्षे तुरुंगवास भोगलेल्या बाहुबली नेत्याचा अख्खा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन; पाहा फोटो!

येथे क्लिक करा