Pradeep Pendhare
शिवसेना पक्षचिन्हाचा निकाल लागला तर काय बदलणार? सर्वोच्च न्यायालयातील लढाईचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर किती परिणाम करणार?
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना पक्षावर अधिकार आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. ठाकरेंकडून युक्तिवाद संपल्यानंतर आता शिंदेंकडून बाजू मांडली जाणार आहे.
शिवसेना पक्षावरील ठाकरेंकडून दावा मजबूत झाल्यास, वारशाचा मोठा परिणाम होऊन, संघटनात्मक पातळीवर नवी समीकरणे तयार होऊन ठाकरेंना राजकीय फायदा होईल.
एकनाथ शिंदेंच्या बाजून निकाल गेल्यास, शिवसेना म्हणून राजकीय ओळख अधिक मजबूत होऊन संघटनेच्या दाव्याला बळ मिळून सत्ताधारी महायुतीत स्थान मजबूत होईल.
एकनाथ शिंदे यांना आगामी निवडणुकांमध्ये ‘शिवसेना’ नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर लढल्याचा फायदा होईल.
या निकालाचा सर्वाधिक राजकीय परिणाम शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यावर होणार असून, ते ठाकरेंना की, शिंदेंना मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई ही शिवसेनेच्या राजकारणाची पारंपरिक ताकद राहिली आहे. निकालामुळे मुंबईतील राजकीय समीकरणे, स्थानिक संघटनांची दिशा बदलणार आहे.
शिंदेंकडून दावा मजबूत झाला तर महायुतीतील त्यांचे राजकीय स्थान आणखी मजबूत, तर ठाकरेंच्या बाजूने निकाल गेल्यास मुंबईसह मविआमध्ये राजकीय स्थान बळकट होईल.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचे, शिंदे की ठाकरे यांचे? या निकालानंतर महायुती आणि मविआची देखील राजकीय दिशा बदलणार असल्याने महाराष्ट्रात अनेक राजकीय बदल दिसतील.