Highest Corruption : धक्कादायक! देशात महाराष्ट्र भ्रष्टाचारात पहिला, तर 'हा' जिल्हा राज्यात आघाडीवर

Rashmi Mane

भ्रष्टाचारात वाढ

देशात भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहेत. तरीही अनेक ठिकाणी भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे.

NCRB Highest Corruption In Maharashtra: | Sarkarnama

NCRB चा अहवाल

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (NCRB) च्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

NCRB Highest Corruption In Maharashtra: | Sarkarnama

अधिक प्रकरणे महाराष्ट्रात

2023 मध्ये देशभरात तब्बल 1,139 भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदली गेली. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 763 प्रकरणे महाराष्ट्रात उघड झाली आहेत. म्हणजेच देशातील एकूण प्रकरणांपैकी जवळपास अर्ध्याहून अधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत.

NCRB Highest Corruption In Maharashtra: | Sarkarnama

भ्रष्टाचार होणारे राज्य ठरले

त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा सर्वाधिक भ्रष्टाचार होणारे राज्य ठरले आहे. भ्रष्टाचाराच्या यादीत महाराष्ट्रानंतर हरियाणा, आसाम आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा क्रमांक लागतो.

NCRB Highest Corruption In Maharashtra: | Sarkarnama

भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध

महाराष्ट्रातही पुणे हे शहर सर्वाधिक भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध ठरले आहे. पुण्यात 28 प्रकरणे उघडकीस आली आहेत.

NCRB Highest Corruption In Maharashtra: | Sarkarnama

या शहरांतही भ्रष्टाचारात वाढ

याआधी देशात कोयंबतूर आणि चेन्नई या शहरांत भ्रष्टाचाराचे मोठे प्रकार उघड झाले होते. मात्र आता पुणे, नागपूर आणि मुंबई या शहरांतही भ्रष्टाचार वाढल्याचे दिसते.

NCRB Highest Corruption In Maharashtra: | Sarkarnama

वाढत्या आत्महत्या

त्यासोबतच एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे वाढत्या आत्महत्या – या दोन गंभीर समस्या महाराष्ट्राला मोठे आव्हान ठरत आहेत. शासन-प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी या समस्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे

NCRB Highest Corruption In Maharashtra: | Sarkarnama

Next : दिवाळीपूर्वी एलपीजी सिलेंडर झाले महाग; तुमच्या शहरात किती झाली किंमत? 

येथे क्लिक करा