Shrikant Bharatiya : माढ्यासाठी भाजपचे रणनीतीकार लागले कामाला : श्रीकांत भारतीय

Vijaykumar Dudhale

मोहिते पाटील हे बंडाच्या पवित्र्यात

माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिल्याने मोहिते पाटील हे बंडाच्या पवित्र्यात आहेत.

Shrikant Bharatiya | Sarkarnama

भाजप -राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

माढ्यातील उमेदवारीचा पेच सोडविण्यासाठी भाजपचे रणनीतीकार आणि आमदार श्रीकांत भारतीय यांनी आज सूत्रे हाती घेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली.

Shrikant Bharatiya | Sarkarnama

युतीधर्म

फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद मिटविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीत फडणवीसांनी युतीचा धर्म पाळून निंबाळकर यांचे काम करण्याची विनंती केली.

Shrikant Bharatiya | Sarkarnama

‘एव्हरीथिंग इज ओके’

दोन निंबाळकर यांच्यातील वाद मिटविण्यासाठी आमदार श्रीकांत भारतीय पुढाकार घेतला. बैठकीनंतर त्यांनी ‘एव्हरीथिंग इज ओके’ असे सांगून बैठक सकारात्मक झाल्याचा दावा केला आहे.

Shrikant Bharatiya | Sarkarnama

निवडणूक रणनीतीत हातखंडा

श्रीकांत भारतीय हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील परतवाड येथील आहेत. ते सध्या मुंबईत स्थायिक आहेत. निवडणुकीत विजयापर्यंत नेणारी रणनीती आखण्यात भारतीय यांचा हातखंडा आहे.

Shrikant Bharatiya | Sarkarnama

फडणवीसांचे निकटवर्तीय

देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी श्रीकांत भारतीय यांची ओळख आहे. त्यांनी विद्यार्थी परिषदेपासून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली.

Shrikant Bharatiya | Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्रात काम

पश्चिम महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी श्रीकांत भारतीय यांनी परिश्रम घेतले आहेत. त्याचे फळ म्हणून त्यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली आहे.

Shrikant Bharatiya | Sarkarnama

माढ्याचा तिढा कसा सोडवणार

मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची समजूत घालण्याचे मोठे कठीण काम श्रीकांत भारतीय यांच्यावर देण्यात आलेले आहे. माढ्याच्या तिढ्यातून ते भाजपची कशी सुटका करतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

R

Shrikant Bharatiya | Sarkarnama

सातत्याने अपयश मात्र जिद्द सोडली नाही; कृती जोशीची UPSC त उत्तुंग भरारी!

IRS Kriti joshi | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा